Share
HomeMessageCall Us

सामान्य प्रशासन विभाग

प्रस्तावना

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदे मध्ये असणा-या एकूण 14 विभागां पैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व खात्यांकडील प्रशासकीय प्रस्ताव प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते. सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्यत्वे करुन जिल्हा परिषदेकडे केल्या जाणा-या सर्व नेमणुका पदोन्नत्या जिल्हा बदल्या नियतकालीक बदल्या खाते निहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ठ कामाबद्दल कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी पुरस्कार इ.कामांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद सर्व साधारण सभा स्थायी समिती सभा यांचे कामकाज पाहिले जाते. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-1 व 2 मधील अधिका-यांच्या आस्थापनेचे काम या विभागाकडेच आहे.

तालुक्यांतर्गत असणा-या गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण उप विभाग (बांधकाम व ग्रापापु) प्रा.आ.केंद्रे, जनावरांचे दवाखाने, केंद्र शाळा अंगणवाडया यांचेमार्फत राबविणेत येणा-या शासनाच्या वेगवेगळया विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीतपणे व यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही त्याच प्रमाणे प्रशासकीय कामांचा आढावा याची पहाणी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे मार्फत वार्षिक तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे मुख्ययालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी दुस-या तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीव्दारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो. या विभागामार्फत समता दिन,दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, क्रांती दिन,सद्भावना दिवस,संकल्प दिन,एकता सप्ताह, हुतात्मा दिन या बरोबरच प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन,कामगार दिन कार्यक्रमाचे आयोजन व अंमलबजावणी यावर नियंत्रण व परिरक्षण केले जाते.

जिल्हा परिषदेकडून शासनाच्या आरक्षण विषयक धोरणानुसार ज्या त्या संवर्गातील आरक्षणानुसार पदांची भरती केली जाते किंवा नाही, मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याच प्रमाणे विकासाच्या योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याच प्रमाणे विकासाच्या अन्य योजना ग्रामीण जनतेला देणे कामी जिल्हा परिषदेने काय प्रयत्न केले याबाबतचा आढावा घेणेसाठी पंचायत राज समिती, अनुसूचीत जाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती,वि.जा.भ.ज.कल्याण समिती,अनुसूचीत जमाती कल्याण समिती, महिला हक्क व बालकल्याण समित्या भेट देतात. समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण या विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषदे मार्फत राबविणेत येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा व मार्गदर्शन करणेसाठी खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, उप अभियंता (बांधकाम व ग्रापापु), गट शिक्षण अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची मासिक बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे नियोजन विभागामार्फत केले जाते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विभागीय स्तर व राज्य स्तरावरील बैठकीसाठी लागणा-या आवश्यक माहितीचे एकत्रीकरण या विभागामार्फत करणेत येते. मा.लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ज्या वेळी गडचिरोली जिल्हयाच्या भेटीकरिता येत असतात, त्यावेळी विकास कामे व आस्थापना विषयक बाबी संदर्भात माहिती या विभागामार्फत दिली जाते.

राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान दरवर्षी 20 ऑगष्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत राबविले जाते. अभियांनांतर्गत कार्यालय सुशोभिकरण, अभिलेख वर्गीकरण, कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता कार्यपध्दती सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स खर्चात काटकसर, महसुली उत्पन्न वाढविणे नियमांचे अधिनियमांचे एकत्रीकरण करणे, प्रशासन लोकाभिमुख्य करणे कर्मचा-यांचे आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे इ.बाबी अभियानांतर्गत राबविणेत येतात. सामान्य प्रशासन विभागामार्फत या अभियानाचे नियंत्रण केले जाते. जिल्हा परिषदेत सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचार्यांना दैनंदिन कामकाजामध्ये उद्भवणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान मध्ये ही प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद सेवेत नव्याने दाखल झालेले कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी या विभागामार्फत करणेत येते.

 Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या