Share
HomeMessageCall Us

अर्थ विभाग

अर्थ विभाग

जिल्हा परिषद अंतर्गत हा अत्यंत महत्वाचा विभाग असून जिल्हा परिषदेच्या कारभारावर वित्तीय नियंत्रण हा विभाग करतो. जि.प.कडील प्रत्यक्ष जमा व खर्च यांचे हिशेब ठेवणे, तसेच जि.प.कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवणे, जि.प.कर्मचा-यांची सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे तसेच जि.प.चे स्वत:चे उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच वित्तीय औचित्याचे पालन करणे संबंधी सर्व विभागांना मार्गदर्शन करणे.विभागाचे प्रमुख असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या सर्व बाबींवर प्रामुख्याने नियंत्रण ठेवतात.

जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्नाचे अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी या विभागावर असल्यामुळे, जि.प.चे जमा व खर्चावर नियंत्रण हा विभाग ठेवतो.

वित्त विभागातर्गत शाखा

1. संकलन शाखा

जिल्हा परिषदेतंर्गत वित्त विभागातील ही शाखा अत्यंत महत्वाची असुन जिल्हा परिषदेला प्राप्त अनुदाने व त्यानुषंगाने होणा-या खर्चावर नियंत्रण ठेवणे तसेच जि.प.ची जमा व खर्चाचे हिशेब महा.जि.प.व प.स.लेखासंहिता 1968 नुसार ठेवले जातात. सदर जमा व खर्चाचे लेखे संगणीकृत असुन मासीक तसेच वार्षिक लेखे संगणीकृत असुन सदर संगणीकृत लेखे शासनास सादर केले जातात. तसेच विविध विभागांकडुन प्राप्त मासीक व त्रैमासीक लेखे तपासुन शासनास सादर केली जातात.  

 2. भविष्य निर्वाह निधी शाखा

एकुण 7750 जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे या शाखेत ठेवले जातात.  पंचायत समिती स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी कपातीच्या रकमा तालुका स्तरावरील उपकोषागारात जमा करुन चलानची प्रत व खातेनिहाय यादी वित्त विभागास सादर केली जाते.  त्याची नोंद संबधित कर्मचाऱ्याचे खात्यात घेतली जाते. सदर लेखे शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात संगणीकरणाद्वारे ठेवल्या जातात. सर्व कर्मचा-यांना वित्तीय वर्षाचे अखेर शिलकेचे विवरण माहे जुन मध्ये वितरीत केल्या जातात. तसेच सेवानिवृत्त कर्मचारीं यांचे अंतिम प्रदानाची प्रकरणे तात्काळ निकाली काढली जातात.

 3. सेवानिवृती शाखा

जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे, तात्पुरती सेवानिवृत्ती प्रकरणे याद्वारे तपासणी करून त्वरीत मंजुर केली जातात. तसेच से.नि.कर्मचारी यांचे वेतन स्थानांतराचे प्रस्ताव, सुधारीत वेतन इ. प्रकरणे निकाली काढली जातात.

 

 4. अंदाजपत्रक शाखा

जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक याद्वारे तयार केले जाते. तसेच शासनाचे विविध योजनांचे अंदाजपत्रक तयार करणे, शासनाकडून प्राप्त अनुदान कोषागारातून काढणे, अधिकोषात जमा करणे, महालेखाकार नागपूर यांचेशी मासीक ताळमेळ करणे, विनीयोजन लेखे तयार करुन शासनास सादर करणे.

5. अंकेक्षण शाखा

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांकडुन वित्त विभागाकडे प्राप्त देयके तपासुन ती अचुक असल्यास पारीत करणेस्तव सादर करणे. यास्तव वित्त विभागाकडे तीन अंकेक्षक ही कार्यवाही करतात. विभागांची विभागणी तीन अंकेक्षकामध्ये केली आहे. सदर कार्यवाही संगणीकृत लेखा प्रणालीद्वारे केली जाते. तसेच देयके पारीत करतांना लेखाशिर्ष, मंजुर अनुदान, खर्चाची बाब तपासणी करण्यांची कार्यवाही केली जाते.

 6. आस्थापना शाखा

वित्त विभागातंर्गत कार्यरत कर्मचा-यांचे आस्थापना विषयक बाबी याद्वारे हाताळली जातात. तसेच लेखा संवर्ग कमचा-यांची सेवाजेष्ठता सुची, स्थानांतर, पदोन्नती ई. बाबत कार्यवाही केली जाते. त्याचप्रमाणे वित्त विभागांतर्गत राजपत्रित अधिका-यांचे आस्थापना विषयक प्रकरणे हाताळली जातात.

 अंतर्गत लेखापरिक्षण: जिल्हा परिषदेतर्गत सर्व कार्यालयांचे निरिक्षण करण्यांची कार्यवाही याद्वारे केली जाते. सर्व खातेप्रमुख, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य, हायस्कुल, ए.बा.वि.से प्रकल्प, बांधकाम, सिंचन, ग्रापापु उपविभाग इत्यादी कार्यालयानी  कामकाजाचे अंतर्गत लेखा परिक्षण केले जाते. तसेच स्थानिक निधी लेखा , पं.रा.स. व महालेखाकार यांनी घेतलेल्या आक्षेपाचे मुख्यालय तथा पंचायत समित्यांनी निकाली काढणेस्तव नियंत्रक अधिकारी म्हणून काम पार पाडतात.

संगणीकृत लेखाप्रणाली: जिल्हापरिषदेमध्ये युनिक्सबेस नेटवर्कीग तत्वावर सदर सॉफटवेअर सन 1998 पासुन कार्यान्वीत करण्यांत आले आहे. याद्वारे सर्व विभागांकडील प्राप्त देयके भरून लेखासंहितेनुसार विहीत नमुने प्राप्त केली जातात. मुख्यालयी सर्व विभाग नेटवर्कीगच्या जाळयाने जोडली गेली आहेत. वित्त विभागातंर्गत धनादेश ताळमेळ, वेतन देयके, अनुदान प्रणाली, बीडीएस द्वारे कामकाज इ. व इतर कामकाजाचे संगणीकरण करण्यांत आले आहे.

 

Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या