आरोग्य विभाग
आरोग्य विभाग
प्रस्तावना :-
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरीता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंत वेगवेळ्या राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, मोफशिल दवाखाना व उपकेंद्रा मार्फत स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य सेवेचे कामकाज करतात. तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत अपेक्षित लाभार्थ्यांना सेवेसाठी प्रवृत्त करतात. व आवश्यकतेनुवार योग्य ठिकाणी संदर्भ सेवा देतात.
सर्वांसाठी आरोग्य हे जागतीक आरोग्य संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत लोक सहभागातून ग्रामीण भागातील जनतेला सातत्याने गुणात्मक सेवा देत असतात.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाण :-
भारत सरकारने समाजातील गरीब, जोखमीच्या व द्रारिद्र्य रेषेखालील लोकांना परिणामकारक सेवा पुरविण्यासाठी तसेच माता मृत्यू, अभ्रक मृत्यूचे प्रमाण कमी करणे व एकूण जननदर कमी करणे यासाठी सन 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाण (NRHM-National Rural Health mission) ची स्थापना केलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अभियानाची स्थापना करण्यांत आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य संबंधित इतर कार्यक्रम यांच्या मधील समन्वय तसेच खाजगी वैद्यकिय व्यवसायीक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेऊन आरोग्याचे कार्यक्रम प्रभाविपणे राबविणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.