Share
HomeMessageCall Us

शिक्षण विभाग प्राथमिक

शिक्षण विभाग  (प्राथमिक)

प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाज परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे ही बाब विचारात घेवून गडचिरोली जिल्हा परिषदेने केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी व वयोगट ६ ते १४ मधील मुले शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून जिल्हा परिषद, खाजगी स्वयंसेवा संस्था, आदिवासी विकास विभागामार्फत खेड्यापाड्यात प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या 1533 प्राथमिक शाळा असून त्यात फक्त मुलींसाठी २० प्राथमिक शाळा व 10 माध्यमिक शाळा आहेत.

नगर परिषदेच्या गडचिरोली व देसाईगंज येथे १९ शाळा आहेत. तसेच धानोरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा येथे केंद्रपुरस्कृत कस्तुरबा गांधी मुलींचे निवासी विद्यालय आहेत. चामोर्शी तालुक्यात घोट येथे जवाहर नवोदय विद्यालय आहे.

खाजगी व्यवस्थापनाच्या ३५ अनुदानित प्राथमिक शाळा असून ५२ कायम विना अनुदानित प्राथमिक शाळा आहेत. 

विद्यार्थी हा केंद्र  बिंदू मानून सन २००३-०४ या वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेकरिता “राजर्षी शाहू सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम” राबविलेला होता. हा उपक्रम राज्यामध्ये एक आदर्शवत उपक्रम ठरलेला होता. या उपक्रमास राज्य व देश पातळीवरुन पुरस्कार मिळालेले आहेत. शासनाने या उपक्रमाची नोंद घेवून संपूर्ण राज्याकरिता सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम सुरु केलेला आहे.

या विभागाचे कामकाम सर्व शिक्षा अभियान व आस्थापना विभागामार्फत केले जाते.

शासकीय योजना

 • मुलींची पटसंख्या वाढविणेसाठी प्रा.शि. उत्तेजनार्थ पारितोषिक.
 • प्राथ. शाळातून पुस्तक पेढ्या उघडणे.
 • दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येणेसाठी मुलींना उपस्थिती भत्ता.
 • १०३ विकास गटातील इ. १ ली, ४ थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविणे.
 • शैक्षणिक दृष्ट्या मागास भागातील प्रा.शि. मधील अनु.जाती/ अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती.
 • १०३ विकास गटासाठी इ. १ ली, ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरविणे.
 • माजी शासकीय माध्यमिक शाळा इमाती बांधकामासाठी जि.प. ना अनुदान.
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणे.
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देणे.
 • ४ टक्के सादिलवार मधून जि.प.च्या प्राथमिक शाळांना कार्यालयीन खर्चासाठी अनुदान पुरविणे.
 • प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती.

 Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या