Share
HomeMessageCall Us

शिक्षण विभाग माध्यमिक

शिक्षण विभाग (माध्यमिक)

 गडचिरोली जिल्हयामधील खाजगी, जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाची  एकूण 324 शाळा असून त्यात खाजगी अनुदानीत 146 शाळा, विनाअनुदानीत 76 शाळा, माजी शासकिय जिल्हा परिषद ०२ शाळा, जिल्हा परिषद ०८ शाळा, खाजगी सैनिकी ०१ शाळा, नवोदय विद्यालय ०१ शाळा, सीबीएसई ०१ शाळा, समाज कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या ०३ आश्रम शाळा तसेच आदिवासी विभागामार्फत सुरु असलेल्या ८६ आश्रम शाळा आहेत.

 उपरोक्त खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिक्षकांची एकूण 1895 पदे मंजूर असून त्यापैकी 1869 पदे भरलेली आहेत. उर्वरित २६ पदे रिक्त आहेत. तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यांची एकूण 951 पदे मंजूर असून त्यापैकी 865 पदे भरलेली आहेत. व उर्वरीत 86 पदे रिक्त आहेत.

 १)        राजमाता जिजाऊ मुलींना मोफत सायकल वाटप योजना

या योजने अंतर्गत सन 2012-13 मध्ये एकूण 958 विद्यार्थ्यांकरीता प्रस्ताव मा.शिक्षण संचालक, पुणे यांना सादर  करण्यांत आला आहे.

 २)        अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना

अटी :- १) सदर योजना राज्यातील इयत्ता १ली ते १०वी च्या मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे

2)      अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५० टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. इयत्ता १ली ते ८वी साठी सन 2010-11 पासून श्रेणी पध्दती असल्याने क्रमांक १ (५१ ते ६० टक्के व त्याकरीता श्रेण्या ग्राह्य धरल्या जातील.

3)      विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये १,००,००० लाखापेक्षा कमी असावे.

4)      एका कुटूंबातील दोन पेक्षा जास्त मुलांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.

5)      सदर शिष्यवृत्तीमध्ये ३० टक्के शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे.

 3)     आदिवासी विद्यार्थ्यांना विद्या वेतन

सन 2012-13 मध्ये वरील योजनांमध्ये रुपये 68,०००/- तरतूद प्राप्त झालेली असून रुपये 68,000/- खर्च झालेला आहे. ही सवलत आदिवासी विभागातील अनुसूचीत जमातीचा असावा, उपस्थिती ७५ टक्के व समाधानकारक प्रगती, किमान १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे अशा इयत्ता ५ ते १० वी च्या मुलांना देण्यांत येते.

 

4)     प्राथमिक शिक्षक पाल्य सवलत

सन 2012-13 मध्ये वरील योजनेमध्ये रुपये २७,०००/- तरतूद प्राप्त झालेली असून रुपये 27,000/- खर्च झालेला आहे. ही सवलत प्राथमिक शिक्षकांच्या फक्त दोन पाल्यांना अनुज्ञेय राहील. ही उपस्थिती ७५ टक्के व समाधानकारक प्रगती, किमान १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे अशा इयत्ता ११ ते १२ वी व पदव्युत्तर  पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता देण्यांत येते.

5)   माध्यमिक शिक्षक पाल्य सवलत

सन 2012-13 मध्ये वरील योजनेमध्ये रुपये 23,000/- तरतूद प्राप्त झालेली होती. रुपये 23,000/- खर्च झालेला आहे. ही सवलत अनुदानीत तसेच विनाअनुदानीत शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या फक्त दोन पाल्यांना अनुज्ञेय राहील. ही उपस्थिती ७५ टक्के व समाधानकारक प्रगती, किमान १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे अशा इयत्ता ११ ते १२ वी व पदव्युत्तर  पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता देण्यांत येते.

 6)   इयत्ता १०वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण

सन 2012-13 मध्ये वरील योजनेमध्ये रुपये 3.06 लाख तरतूद प्राप्त झालेली असून रुपये 3.06 लाख खर्च झालेला आहे. ही सवलत अनुदानीत तसेच विनाअनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के व समाधानकारक प्रगती, किमान १५ वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे अशा इयत्ता १ली ते १०वी  पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता देण्यांत येते तसेच अनुदानीत शाळांना सत्र शुल्क व प्रवेश शुल्क यांची शाळांना प्रतीपूर्ती करण्यांत येते.

 

7)   पूर्वमाध्यमिक / माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना

सन 2010-11, सन 2011-12 व सन 2012-13 या वर्षातील एकूण पात्र शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी १३७५ पैकी १३३५ विद्यार्थ्यांचे प्राप्त झालेले बॅकखाते ऑनलाईन करण्यात आले. व १४ विद्यार्थ्यांचे अन्य जिल्ह्यात स्थानांतर झाल्याने मायग्रेशन दाखविण्यात आले व उर्वरित २६ विद्यार्थ्यांचे बॅक खाते अप्राप्त आहेत.

 

 

 

 

Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या