Share
HomeMessageCall Us

पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभाग

पशुसवंर्धन विभागांतर्गत जिल्हयात  पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत आहेत. पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्यांबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनु.जाती, जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.

पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कार्य व उद्दिष्टे :-

  • गोपालकांना पशुवैदयकिय सेवा पुरविणे.
  • संकरीत गोपैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे
  • कुक्कुट विकास, शेळी-मेंढी विकास करणे
  • वैरण विकास कार्यक्रम राबविणे.
  • पशुपालनातून स्वयंरोजगार निर्मिती करणे
  • जिल्हा परिषद, राज्य शासन, केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विषयक विविध योजना राबविणे.
  • पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
  • प्रचार व प्रसार योजना राबविणे.

 Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या