कृषि विभाग
कृषी विभाग
कृषि विभागाकडे प्रामुख्याने शेतक-यांना आवश्यक असणा-या निविष्ठा पुरवठयाचे काम आहे. त्या मध्ये खते, बियाणे, किटकनाशके, औजारे यांचा समावेश आहे. जिल्हयामध्ये आवश्यक असणारा खताचा साठा गरजेइतके बियाणे व किटकनाशके ही निरनिराळया विक्री केंद्रावर उपलब्ध करुन ठेवणे, त्यावर नियंत्रण ठेवणे हे या विभागामार्फत पाहीले जाते सदर कामाचे सयनियंत्रण पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागामार्फत करणेत येते.
भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील विदर्भ प्रदेशात हा जिल्हा आहे. कृषि हवामान शास्त्राच्या दृष्टिकोनातुन विदर्भाचे पर्जन्यमाना नुसार चार भाग पडतात. निश्चित पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, मध्यम ते जास्त पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश. यामध्ये संपुर्ण गडचिरोली जिल्हा निश्चित पावसाचे प्रदेशामध्ये मोडतो.
जिल्हा परिषद मधील हा विभाग ग्रामीण भागातील शेतब क-यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी. या दृष्टिने कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शेतक-यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. व शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.