Share
HomeMessageCall Us

ग्रामपंचायत विभाग

पंचायत विभाग जिल्हा परिषद गडचिरोली

प्रस्तावना

गडचिरोली जिल्हा अति मागास, उद्दोग विरहीत जंगल व्याप्त लहान लहान वाडी, वस्त्यांनी वसलेला आहे. येथील बहुतांश लोक आदिवासी जमातीचे असून ते जंगलातील, डोंगराळ भागात दहाबारा कुटुंबाच्या समवेत लहान लहान वाडी, टोल्यात वास्तवाने राहतात. गडचिरोली जिल्हात ऐकूण १६८० गावे असून यात रीठी गावाचा समावेश आहे. जिल्ह्यात २ नगर परिषद असून ऐकूण १२ तालुके आहेत. तालुक्या अंतर्गत ऐकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये गटग्रामपंचायती ३७१ आहेत. तर स्वतंत्र ग्रामपंचायतिची संख्या ९६ आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत शासनाच्या कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करणे, सामाजिक व आर्थिक गुणवत्ता उंचावण्यासाठी पदाधिकारी व  ग्रामसेवकांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे  ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्यासाठी तसेच गावातील नागरिकांसाठी उद्बोधन व मेळाव्याचे आयोजन करणे, ग्राम पंचायत भेटी, ग्रामपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीसाठी सनियंत्रण करणे, ग्रामपंचायतीची तपासणी, ग्रामपंचायतीना भौतिक सुविधा पुरविणे, गावे हागणदारीमुक्त करून निर्मल गाव करणे, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजने अंतर्गत गावात रोजगार उपलब्ध करून देणे, व मालमत्ता तयार करणे तसेच ग्रामपंचायती मार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे तसेच शासनाच्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामपंचायती मार्फत केल्या जाते.

                                             जिल्हा परिषद अंतर्गत तालुका निहाय ग्रामपंचायतीची संख्या

अ.क्र.

तालुका

ग्रामपंचायतीची संख्या

१.

गडचिरोली

५१

२.

आरमोरी

३४

३.

देसाईगंज

१९

४.

कुरखेडा

४५

५.

कोरची

३०

६.

धानोरा

६२

७.

चामोर्शी

७६

८.

मुलचेरा

१७

९.

अहेरी

४०

१०.

एटापल्ली

३२

११.

भामरागड

२०

१२.

सिरोंचा

४१

 

एकूण

४६७

 

जिल्हा परिषद गडचिरोली

विभागाचे नाव :- पंचायत विभाग

विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना

 • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
 • संपूर्ण स्वच्छता अभियान (निर्मल भारत अभियान)
 • यशवंत पंचायत राज अभियान
 • १३ वा वित्त आयोग
 • संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र)

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना

ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्रमांक व्ही.पी.एम २६१०/प्र.क्र.१/परा-४ दिनांक १२ ऑगस्ट २०१२ अन्वये पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना ग्रामपंचायतस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेत निकषाची पूर्तता करून पात्र ठरणाऱ्या पंचायातीना लोकसंखेच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जाते.

          गावाचा पर्यावरण दृष्ट्या विकास व गावात दर्जेदार सुविधा निर्माण करून गाव समृद्ध करण्यास आपण एवढे करूया.

 • ग्रामपंचायतीच्या हद्दीत लोकसंख्येच्या ५० टक्के झाडे लावून त्याचे संवर्धन करणे.
 • पुढील दोन वर्षात लोकसंख्येच्या प्रमाणात उर्वरित झाडे लावून ती जगविण्याची हमी
 • गाव ६० टक्के हागणदारीमुक्त
 • सर्वप्रकारच्या करांची ६० टक्के थकबाकीसह वसुली
 • प्रचलित नियमानुसार गावात ५० मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यावर पूर्ण बंदी
 • विविध उस्तवातील मूर्तीचे विसर्जन करतांना पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाचा ठराव आणि अंमलबजावणी
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान  आणि यशवंत पंचायत राज अभियानात भाग घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी.

तर तुम्हाला मिळेल भरघोस निधी .......

गाव नंदनवन करण्यासाठी सुधारणा करा, सहभागी व्हा, कामगिरी दाखवा आणि पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून निधी मिळवा.

१.    योजनेच्या सन २०१०-११ या प्रथम वर्षात पात्र ठरलेल्या १३२ ग्रामपंचायतींना ४ कोटी ३० लक्ष एवढा निधी थेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.

२.    योजनेच्या सन २०१०-११ या दुसऱ्या वर्षात प्रथम वर्षापैकी पात्र ठरलेल्या ९२ ग्रामपंचायतींना २ कोटी ८३ लक्ष व प्रथमतः सहभागी होऊन पात्र ठरलेल्या ७५ ग्रामपंचायतीना २ कोटी २६ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

३.    योजनेच्या तिसऱ्या वर्षात उर्वरित २६० ग्रामपंचायती सहभागी होण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्याकरिता दिनांक १ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजन व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे आयोजन करून योजनेचे महत्व पटवून देण्यात आले.तसेच योजनेच्या निकषाची पूर्तता करण्याकरिता  ग्रामस्थानचा सहभाग वाढविणे, करवसुली करणे, शौचालयाचे बांधकाम करणे. वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करणे, शालेय विद्यार्थीकरिता निबंध स्पर्धेचे व वकृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करून विशेष मोहीम राबविण्यात येत आली.

४.    त्यानुसार सन २०१२-१३ या वर्षात पहिल्या वर्षाकरिता ८५, दुसऱ्या ८३ व तिसऱ्या वर्षाकरिता ७३ ग्रामपंचायती सहभागी झालेल्या आहेत.

 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

 • पाणी व्यवस्थापन
 • सांडपाणी व्यवस्थापन
 • शौचालय व्यवस्थापन
 • घन कचरा व्यवस्थापन
 • घर / गाव परिसर स्वच्छता
 • वैयक्तिक स्वच्छता
 • कुटुंब कल्याण
 • लोकसहभाग
 • सामुहिक पुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम

१.    सन २००८. २००९ या वर्षात पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत ग्राम पंचायत  पिंपळगाव च्या विभागातून प्रथम क्रमांक आलेला असून त्यांनी १० लक्ष रुपायचे बक्षीस पटकाविले आहेत.

२.    या अभियाना अंतर्गत सन २००९-२०१० या वर्षात पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत ग्राम पंचायत एकलपूर चा विभागातून द्वितीय क्रमांक आलेला असून त्यांनी ८ लक्ष रुपायचे बक्षीस पटकाविले आहेत.

३.    सन २०१०.२०११ या वर्षात पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत  ग्रामपंचायत कासारी चा विभागातून प्रथम क्रमांक आलेला असून त्यांनी १० लक्ष रुपयाचे बक्षीस पटकाविले आहे.

 यशवंत पंचायत राज अभियान

          जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अतिशय पारदर्शक व वस्तूनिस्ट पद्धतीचा अवलंब केला असल्यामुळे चांगल्या काम करणाऱ्यां पंचायत राज संस्थाचिच  पुरस्कारासाठी निवड करून त्याचा गौरव करण्यात येत असतो. या अभियानामध्ये प्रामुख्याने संस्थांनी केलेली विविध विकास कामे, प्रशसकीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, लेखा परीक्षण निपटारा, समितीविषयक कामकाज, कर्मचाऱ्यांचा नियमितपणा, कार्यालायाचाचे संगणकीकरण, ग्रामस्त्याच्या प्रश्नाना दिलेला समयबद्ध प्रतिसाद, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे इत्यादी बाबत सत्यातपूर्ण पद्धतीने काम केले तरच ती संस्था पुरस्कारासाठी पात्र ठरते. यामध्ये पंचायत राज संस्थांनी संपूर्ण गतवर्षी केलेल्या कामाचे मूल्यमापन होत असल्यामुळे त्याचे स्वरूप इतर कामाचे मूल्यमापन होत असल्यामुळे त्याचे स्वरूप इतर पुरस्कार/मोहीम स्वरूपाप्रमाणे नसून यामध्ये एक सातत्य अभिप्रेत आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे कार्यसंस्कृती सुधारनेबरोबरच जनतेला पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्यातहोईल.

          या अभियानांतर्गत पंचायत समिती कोरची ला अनुसूचित क्षेत्रातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला असून रुपये १५ लक्ष चे पारितोषिक पटकावले आहे. तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव ता. देसाईगंज ला अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती मधून राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून त्यांनी रुपये ६ लक्ष चे बक्षीस पटकाविले आहे.

                 १३ वित्त आयोग

        भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करण्यासाठी केंद्राशासनाच्या पंचायत राज मंत्रालयाकडून ई-पीआरआय प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्रत देखील दि. १ मे २०११ पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी (संग्राम संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) सुरवात झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत निधीचे वितरण खालील निकषानुसार करावयाचे आहे.

१.    कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंताची नेमणूक

२.    कंत्राटी पद्धतीने अकौंटंट काम दाट एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक

३.    कंत्राटी पद्धतीने संगणक तज्ञाची नेमणूक

४.    कंत्राटी पद्धतीने टाऊन प्लानिंग एक्सपर्ट/ आफिसारची नेमणूक

५.    ग्रा. पं/पं.स/ जि.प. च्या क्षेत्राअंतर्गत निर्माण झालेल्या विविध मत्ताची देखभाल

६.    गावाअंतर्गत गटारे व गावाअंतर्गत रस्ते बांधकाम (मुरमिकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट कांक्रीटीकरण) तसेच त्यांची देखभाल व दुरुस्ती

७.    पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत गावांना जोडणाऱ्या (ग्रामीण रस्ते) रस्त्याचे बांधकाम देखभाल व दुरुस्ती

८.   जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्गाची  (इतर जिल्हा मार्ग) देखभाल व बांधकाम

९.    ग्रामपंचायत/ ग्रामसचीवालय कार्यालय बांधकाम, देखभाल व दुरुस्ती

१०.  दहन भूमी दफन भूमी देखभाल व दुरुस्ती

११.       आरोग्य ग्राम स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत कामे (उदा. पोर्टेबल व वेईकल माउंटेड फ्लागिंग मशीन, घंटागाडी ट्रक्टर, ट्राली)

१२. घनकचरा प्रक्रियेसाठी पर्यावरण संतुलित तंत्रज्ञान वापरून कमी खर्चाचे प्रकल्प

१३. इकोग्राम साठी पूरक निधी

१४. ग्राम सभा/ ग्रामपंचायत सभा यांच्या द्रुकश्राव्य चित्रीकरणासाठी आवश्यक उपकरणे व साधने घेणे

१५. क वर्ग तीर्थक्षेत्रांची देखभाल व दुरुस्ती

१६. ब वर्ग तीर्थक्षेत्रांची देखभाल व दुरुस्ती

१७. प्रिया सोफ्टवेअर तसेच इ.पी.आर साठी आवश्यक हार्डवेअर व साफ्टवेअरची खरेदी

१८. पंचायत राज संस्थाचे आय.एस.ओ. प्रमाणीकरण

१९.  बायोमेट्रिक्स प्रणाली कार्यरत करणे

२०.  पंचायत राज संस्थाना सौर ऊर्जेवरील उपकरणे व अध्ययावत तंत्रज्ञान

२१.  आगीसारख्या आपत्तीच्या निवारणार्थ उपाय योजना करने

२२.  पंचायत राज संस्थाना सोई सुविधा पुरविणे.

२३.  पंचायत राज संस्थाच्या तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

२४.  महिला शक्ती अभियान राबविण्यासाठी आवश्यक तरतुदी

२५.  नोडल हड होल्डिंग एजन्सी

१३ व वित्त आयोगाअंतर्गत शासनाकडून ४ ग्रॅन्टस मधील (जनरल बेसिक ग्रॅन्टस, जनरल परफॉर्मन्स, स्पेशल बेसिक ग्रंट्स व स्पेशल परफॉर्मन्स ग्रॅन्टस) प्राप्त निधीचे वितरण ग्रामपंचायतींना करण्यात आले असून वरील निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर निधी खर्च करण्याची कार्यवाही सुरु आहे.

               पंचायत राज संस्थेचे संगणकीकरण करण्याच्या दृष्टीने शासननिर्णय दिनांक ३०/०४/२०११ अन्वये १३ व वित्त आयोगांतर्गत गडचिरोली जिल्हांतर्गत तिन्ही स्तरावर संग्राम कक्ष स्थापन करण्यात आला असून सदर संग्राम कक्षाद्वारे ऑनलाईन माहिती संकलित करून शासनास सादर करण्याचे काम सुरु आहे.

Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या