Share
HomeMessageCall Us

लघु पाटबंधारे

लघुपाटबंधारे विभाग

            चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन दिनांक 26/08/1982 पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिनस्त एकूण पाच उपविभाग स्थापन करण्यांत आलेत. उपविभागाचे नांवे अनुक्रमे (१) गडचिरोली उपविभाग (२)  चामोर्शी उपविभाग (३) अहेरी उपविभाग (४) वडसा उपविभाग व (५) कुरखेडा उपविभाग.

            लघुपाटबंधारे उपविभागामार्फत 0 ते १०० हेक्टर चे बांत सिंचनक्षेत्र निर्माण होत असलेल्या योजना कार्यान्वित करण्याची कामे केली जातात.

(१)                लघुपाटबंधारे नविन सिंचन तलाव बांधकाम, (२) कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे, (३) उपसा सिंचन योजना, (४) मा.मा.तलाव विशेष दुरुस्ती, (५) जवाहर सिंचन विहिर ल.पा.योजना  या विभागामार्फत राबविल्या जातात. प्रामुख्याने ० ते १०० हेक्टर ल.पा.योजनांचे  सिंचनक्षेत्र निर्माण करणे. देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन करणे हे या विभागाचे ध्येय धोरण आहे. आतापर्यंत 501 कोल्हापूरी पध्दतीचे बांधकाम करण्यात आले असून त्यापासून ११,१०६ हेक्टर सिंचनक्षेत्र निर्माण झाले आहे. व ५ उपसिंचन योजना पुर्ण करण्यात आलेल्या असून त्यापासून ३२० हेक्टर सिंचनक्षेत्र निर्माण झालेले आहे. व प्रत्यक्ष त्याचा लाभ लाभक्षेत्राअंतर्गत शेतकरी घेत आहेत. त्यामुळे निश्चितपणे शेतका-यांना आर्थिक लाभ झालेला असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या