Share
HomeMessageCall Us

निर्मल भारत अभियान

निर्मल भारत अभियान

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पुरवठा आधारीत, धोरणाएैवजी मागणी आधारीत धोरणातून राज्यभर राबविणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. याच मागणी आधारीत व लोक सहभाग तत्वावर केंद्र पुरस्कृत निर्मल भारत अभियान (संपूर्ण स्वच्छता अभियान८ राज्यात राबविले जात आहे. देशाच्या ग्रामीण भागात जनतेच्या जीवनमानाची गुणवत्ता उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच देशाच्या ग्रामीण भागात सर्व शाळा व अंगणवाड्यामध्ये  मार्च २०१३ अखेर स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे त्याच प्रमाणे शाळेतील मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करणे हे उद्दिष्ठ गाठावयाचे आहे. 

स्वच्छतेतून आरोग्याकडे व आरोग्याकडून समृध्दीकडे हा मुल मंत्र महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात दिलेला आहे. तसेच या अभियानाच्या अंमलबजावणीमुळे समुह शक्तीची जी प्रचिती झाली तिला अधिक कार्यप्रवण करुन हागणदारी मुक्त गांव ही अभिनव चळवळ राबविण्यांत येत आहे. त्यामुळे संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हागणदारीमुक्त गांव चळवळीमुळे उंचावणारे आरोग्यमान विचारात घेऊन केंद्र शासनाने ग्राम पुरस्कार या नावाचा पुरस्कार कार्यक्रम सुरु केला आहे. या योजने अंतर्गत  हागणदारी मुक्त होणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना रोख रक्कम बक्षिस रुपात देण्यांत येते. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 39 ग्रामपंचायती निर्मल झालेल्या आहेत. व सन 2012-13 या वर्षाकरीता 50 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मान्य केलेले आहेत. या वर्षात स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याकरीता निर्मल महाविद्यालय, निर्मल शाळा, रोगराईमुक्त पावसाळ्यासाठी विशेष स्वच्छता अभियान, गवंडी प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग, महिला बचत गट, भजन मंडळे यांचा सहभाग, अभ्यास सहलींचे आयोजन व शालेय स्वच्छता व आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजनाच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये ग्राम पंचायती या वर्षामध्ये निर्मल ग्राम पुरस्काराकरीता पात्र करण्याचे उद्दिष्ठ ठरवून दिले आहे.

 

 Photo

महारष्ट्र लाचलुचपत विरोध

Photo

महारष्ट्र मुल्यवरधतिकर

Photo

महारष्ट्र राज्य परिवहन

Photo

मुंबई वाहतूक पोलीस

Photo

महाराष्ट्र लोकराज्य बातम्या